या शनिवारी ,खरं तर मला
गाण्याची परीक्षा द्यायची होती...म्हणजे माझा form भरून झाला होता...hall ticket
सुद्धा आल होतं....पण अस्मादिक घाबरले ! इतक्या वर्षांनी परीक्षा ! बाप रे !! मग
माझ्या अंतर्मनाने ( बहुदा !) पाठदुखी निर्माण केली...त्यामुळे मी परीक्षेला जाऊच
शकले नाही ! ( हुश्श !!) मी अक्षरशः एक आठवडा आधी पाठांतर सुरु केल होत...त्यामुळे
....जाऊ दे...अधिक न बोलणेच बरे...
मग विचार केला...ही परीक्षा
देणं खरच जरुरी आहे का ...म्हणजे आपण form वगैरे भरला हे ठीक....पण परीक्षेमुळे
खरच काय होतं ? लताबाई ,किशोरीताई किंवा वसंतराव यांपैकी कोणी परीक्षा दिली आहे ?
तसाही परीक्षा देऊन पास झाले असते ,तर त्याचा अर्थ हे आठ राग मला समजले असा आहे का
? ( खरं तर कुठल्याही परीक्षेच्या संदर्भात हा प्रश्न उभा राहतो....) बिलकुल नाही....
मला
वाटतं की मला गाणं समजतच नाही...फक्त मी सुरात गाते ,माझा आवाज चांगला आहे आणि मी
गाण्यांची उत्तम नक्कल करू शकते ..बस्स एवढच ! मला न सूर समजतात न राग... किंबहुना
मला असा वाटत की मी गाणं हे कुठच्याही शास्त्राप्रमाणे शिकू पाहतेय ...शास्त्रीय
संगीताचे शास्त्र...आरोह,अवरोह,पकड,सरगमगीत , आलापीसहित एखादी बंदिश वगैरे शिकल की
गाणं आलं ?
गाण्यात खरं तर Left Brain
चा उपयोग मर्यादित ! Right brain वापरून संगीताची अनुभूती व्हायला हवी
....शास्त्रीय संगीत म्हणजे अमूर्त ! फक्त स्वरातून अनेक गोष्टी सांगणारं ! ..माझे
तर कानही अजून शास्त्रीय संगीत फारसं स्वीकार करू शकले नाहीत ! ( खरं सांगते ...मी
फक्त चित्रपट संगीत आणि सुगम संगीतच ऐकते ) तर ते आत्म्यापर्यंत कस काय पोहोचेल ?
सूर मनाच्या गाभ्यापर्यंत
पोचायला हवेत....पण पहिल्या काही मिनिटांत माझी बुद्धी जागी होते आणि चुळबुळ करू
लागते...शब्दांना प्राधान्य न देणारे सूर नाकारू लागते....भिंती उभ्या करते
....त्यातून ते सूर ( शक्तिशाली असले तरीही बापडेच !) आत जाऊ शकत नाहीत ! Right Brain
वापरण्यासाठी आधी मनाच्या खिडक्या उघडता यायला हव्यात !!
कदाचित कट्यार किंवा
नाट्यसंगीतासारख एखाद संगीत , या मूर्त आणि अमूर्तातील दुवा ठरत ! मी कट्यारची,माझ्या
मनावर विलक्षण प्रभाव टाकून गेलेली गाणी , या सकारात्मक बदलाची नांदी आहे अस मानतेय ! माझ्या गाणं समजण्याच्या प्रवासाची
सुरुवात !!
पण जर अस झाल नाही , तर
मात्र मला खेदपूर्वक, उत्तम नकलाकार म्हणूनच मार्गक्रमण करत राहाण्याखेरीज दुसरा पर्याय
नाही !!
Barobar aahe ... pariksha dili mhanaje naipunya aala asa nahi ... sangit mhanaje kahi vidnyan navhe ... awadel te gava ... swatahala aawadel asa gava ... aatmik aananda milel asa gava ... mag tyakarata kuthalya parikshechi kaay garaj ... tu gaat raha Maya ... te matra thambavu nakos ... fakta tu ghabarat nahis ya goshtisathi ekada pariksha de ... baki gaat raha fakta
ReplyDelete