नाट्यगृहात प्रवेश केला...अरेच्या ! पडदा उघडाच !! एक सुरेख set मांडला होता ...हिरवी , आल्हाददायक रंगसंगती ...की चातुर्याने केलेली प्रकाशयोजना ? एका भिंतीवर एक लक्ष वेधून घेणारे maze...भूलभुलैयाच जणू...कदाचित पुढे नाटकात येणारी गुंतागुंत दर्शवणारे ....
तिसऱ्या घंटेनंतर नाटक सुरु झाले...काहीशा कृत्रिम,नाटकी आणि जुनाट शैलीत पात्र संवाद म्हणू लागली...माझ्या मनात थोडा गोंधळच होता....अचानक एक पिस्तुलही आल त्या नाटकात...आणि काय, कस झाल... काही कळलच नाही...पण अचानक नाटकातलं एक पात्र वळल आणि...आणि...चक्क मलाच गोळी घातली !!!!
(अस मला वाटल खरं ,पण अर्थातच.... मी जिवंत आहे !!.... पहिल्या रांगेत बसल्याचा दुष्परिणाम !)
अतिशय वेगळी सुरुवात असणारा हे नाटक ...आणि नाटकातलं नाटकही ....त्याच्या जबरदस्त दिग्दर्शनामुळे पहिल्या सीन पासूनच मनाची पकड घेते .खून कोणी केला हे नाटकातील कोडं नाहीये तर, का केला आणि हा शेखर खोसला आहे तरी कोण ,या गोष्टींभोवती हे नाटक फिरते.
Flashback दाखवण्याच तंत्र किंवा पात्रांना freeze करून ,एकेकाच्या मनातील आठवणी अभिनित करण्याचा तंत्रही खूप छान आणि वेगळा.विजय केंकरे दिग्दर्शक म्हणून अत्यंत सरस !
नाटकातील अभिनय खूप सशक्त - विशेषतः मधुर वेलणकर - तिने नाटकाच्या नायिकेची भूमिका खूप छान पेलली आहे .Emotional सीन जबरदस्त केले आहेत- गोंधळलेली ,काहीशी पछाडलेली व्यक्तिरेखा खूप सुरेखपणे उभी केली आहे....आपल्या हातांच्या सतत चाळा करण्याच्या सवयीने खूप काही बोलून जाते ती !तिचं नृत्यही अगदी graceful !
तुषार दळवी,लोकेश गुप्ते ,शर्वरी ,विवेक तसेच कविराजच्या भूमिकेतील सुशील इनामदारही चपखल.
खटकण्यासारखी एकाच गोष्ट - शेवट थोडा धूसर वाटतो. खुनामागाचा कार्यकारणभाव नीटसा समाजात नाही...थोडा अस्पष्ट राहतो आणि जेवढा आपल्याला समजतो तोही पचत नाही.
पण एक वेगळा अनुभव अस नक्कीच म्हणता येईल या नाटकाला ......किंबहुना सशक्त अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे नक्की पाहाव असं हे नाटक !

Natak ha maza vishay nahi ... mi nataka farashi pahatahi nahi ... aani ya natakat faar dum nasava karan tuzya vishleshanatahi kahi dum watat nahi aahe ... sorry to say, pan mala hech janavala
ReplyDelete