काही दिवसांपूर्वी Majestic गप्पा आणि ग्रंथप्रदर्शनात जायचा योग आला.सालाबादप्रमाणेच उत्तमोत्तम पुस्तके पाहता आली. पुस्तकं चाळून ,वाचून विकत घेण्याची मजाच काही और ! अस समाधान online पुस्तक खरेदीत मिळत नाही ! असो.
मौज प्रकाशनाची पुस्तक निवडीबाबत अगदी योग्य प्रतिमा आहे. श्री.पु. भागवत होते तेव्हा अगदी प्रत्येक पुस्तक वाचून ,दर्जेदार असल्याची खात्री करून मगच प्रसिद्ध केले जाई.अनेक पुस्तकांवर त्यांचे संपादकीय संस्कार आहेत असेही ऐकिवात आहे. त्यांच्यानंतरही ही परंपरा जिवंत ठेवण्यात आली आहे ह्यात तिळमात्रही शंका नाही !
पन्नाशीचा भोज्या हे मौज प्रकाशनाचे पुस्तक प्रदर्शनात फिरता फिरता दिसण्यात आले. अल्पावधीतच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली आहे आणि मौज प्रकाशन ह्या दोन गोष्टी माझी उत्सुकता चाळवण्यास पुरेशा होत्या.नावही अतिशय वेधक ! म्हटल.. आपली पन्नाशी आता ७-८ वर्षांवर येऊन ठेपलीये...पाहूया तरी लेखक काय म्हणतोय....
पुस्तक विकत घेऊन घरी आले.काम संपवून वाचायला सुरुवात केली. आणि खरच सांगते...एकदा पुस्तक जे उचलले ते संपवूनच खाली ठेवू शकले! अतिशय ओघवती भाषा,कुठेही कंटाळा आला नाही किंवा काही भाग गळून ,स्किप करून पुढे जावसं वाटलाच नाही. गोष्टी ,किस्से अतिशय रंजक,मी स्वतःला अनेक ठिकाणी relate करू शकले.मधेच तिरकस टिप्पणी , एखादी नर्मविनोदी comment किंवा जाणवणारही अशा रीतीने सांगितलेले जीवनविषयी तत्वज्ञान ...वाह !! खूप सुरेख !!
पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या सर्वांचे प्रातिनिधिक अनुभव सांगणारे हे पुस्तक . मुंबईत राहणारे, मराठी शाळेत शिकणारे आणि साधारण एकाच वळणाची स्वप्ने उराशी घेऊन जगणारे आपण सर्व!घरातली संस्कृती ,वातावरण ,शेजार,नाती साधारण एकाच धाटणीची ( म्हणजे डिग्री म्हणजे सबकुछ ,अभ्यास एके अभ्यास ,दहावी हे एवरेस्ट आणि बोर्डात येणे = गगनाला गवसणी घालणे वगैरे वगैरे...)...सार कसा अगदी ओळखीचं !
पण लेखक कुठे तरी एक वेगळी वाट चोखाळतो , चाकोरी मोडण्याचे धैर्य दाखवतो .C.A.पूर्ण करूनही या व्यवसायाला नाकारतो आणि रशियन भाषेच्या प्रेमापोटी तिच्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करतो. पुढे हाच व्यवसायही स्वीकारतो...पण नोकरी सुरु करायच्या आधी , वयाच्या २६ व्या वर्षीच ठरवतो की ४० व्या वर्षी मी या व्यवसायातून निवृत्त होणार.
प्रत्येक पानावर आयुष्याकडे अत्यंत डोळसपणे पाहणारा आणि तरीही आयुष्य enjoy करणारा लेखक भेटतो .एके ठिकाणी तो म्हणतो..." आपल्या पिढीने विचारपूर्वक मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा निर्णय घेतला. माझ्याच वर्गातल उदाहरण सांगतो...बालमोहनमधील अनेक विद्यार्थी IIT ला गेले ( लेखी) पण IIM ला जाऊ शकले नाही( तोंडी).हा आत्मविश्वासाच्या अभावाचा किंवा इंग्रजीच्या न्युनगंडाचा परिणाम....तो आपल्या मुलांना तरी भोगावा लागू नये ही त्या मागची विचारधारा !"
लेखक म्हणतो तसं हे पुस्तक आत्मचरित्र नाही ..पण जे काही आहे ते अत्यंत वाचनीय आहे हे नक्की ! खरोखर पुन्हा पुन्हा वाचाव अस हे पुस्तक !

Maya atyanta oghavatya shailit lihilayes tu ... tadak jaun te pustak ghyava ani wachayala lagavaasa watatay ... keep it up
ReplyDeleteMaya atyanta oghavatya shailit lihilayes tu ... tadak jaun te pustak ghyava ani wachayala lagavaasa watatay ... keep it up
ReplyDeleteआभार गोकुळ !
DeleteAgadi yogya ! Mauj chi javal javal sarv pustake vaachaniy astaat.
ReplyDeleteम्हणूनच डोळे झाकून घेतली तरी चालतात !
Deleteअतिशय मोजक्या शब्दात वर्णन केलेयस पण पुस्तक वाचायची इच्छा झालिये
ReplyDelete