खूप दिवसांपासून मी ब्लॉगवर काहीच लिहिलं नाहीये , हा विचार मनाला बराच त्रास देत होता . हा ब्लॉग सुरु करताना माझा मुख्य हेतू मी वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहिणे हा होता , जेणेकरून माझ वाचन सर्वंकष आणि शिस्तबद्ध होईल . मग हळूहळू इतर विषयही हाताळू शकेन अस वाटलं म्हणून ते Certain other things !
कोण म्हणता लिखाण नेहमी profound हव …..कधीतरी ते मनाचा फेरफटका अशा स्वरुपातीलही असू शकतच की ! ती गुळगुळीत , रंगीत पानांची इंग्रजी मासिके पहा - खरं तर त्यातील जाहिरातीच अधिक माहिती देणाऱ्या असतात …. बाकी असच ….ramblings !
मला अस नेहमीच वाटत , की , लिहिण्यासाठी , या सिद्धहस्त लेखकांना इतके नवनवीन विषय कुठून मिळतात …..माझं या प्रश्नापाशी येऊन , घोडं अडतं , नेहमीच….
आता , मला सर्व प्रश्नांची उत्तरं पुस्तकांत शोधायची सवय ! मग मी लिखाणावर मार्गदर्शक अशी पुस्तकं शोधू लागले …..सुदैवाने ती माझ्या कपाटातच होती…( म्हणजे मी नेहमीप्रमाणे विकत घेऊन ठेवली होती आणि साफ विसरून गेले होते ! )
‘ Writing down bones within ‘ - Natalie Goldberg हे ते पुस्तक...जे मी आजच वाचायला घेतलंय…...त्या अनुषंगाने मनात आलेले काही मुक्तछन्दातले विचार …..( पण गद्यच ! )
सारखे Dazzling , brilliant , विषय काही मिळणार नाहीत….पण हरकत नाही...कुठचाही विषय घेऊन लिहायला सुरुवात केली पाहिजे….पण थोडक्यात...फाफटपसारा वाचायला वेळ कोणाला आहे हल्ली ? मात्र लिखाण interesting , flowing and थोडंफार humorous असेल तर मस्त !
प्रत्येकाच्या लिखाणात स्वतःचा थोडाफार तरी अंश असतो - त्यामुळे आपलं अनुभव विश्व समृद्ध हव - त्यासाठी चांगल ऐकणं , वाचण आणि पाहणं , तसच नवनवीन लोकांना भेटणंही अत्यंत महत्वाचं .
लिहिण्यासाठी बाहेर आणि ( मनाच्या ) आत शांतता हवी…..
वह्या कसल्या वापराव्यात ? - तर चांगल्या , पण तरीही , साध्या - कारण खास ठेवणीतल्या वह्यावर फक्त खास , अगदी उत्तम लिखाण करावस वाटतं - त्यामुळे ते उमटत नसेल तर त्या कोऱ्याच राहतात !
सर्वात महत्वाचं आहे ते सातत्य - रोज किमान दहा मिनिटे तरी लिहिणे - आणि फक्त लिहिणे - मग कसलही editing , punctuation , grammar , spelling काहीही बघायचं नाही….हे लिखाण फक्त आपल्या अंतर्मनातील सृजनशीलतेला जागवण्यासाठी - हे काही आपण कोणाला दाखवायची गरज नाही ...हो...यातून कधीतरी काही उत्तम idea मिळून जाईलही ! ह्याला म्हणतात Timed writing … ( हे लेखन त्यातूनच आलय ! )
हीच concept मागे Julia Cameron नावाच्या लेखिकेच्या पुस्तकातही वाचली होती….मोर्निंग pages या नावाने...म्हणजे सकाळी उठून , इतर काहीही करायच्या आधी , लिहित सुटणे...तीन पूर्ण पान भरेपर्यंत !
आज एवढच वाचलंय आणि अमलातही आणायचा प्रयत्न करतेय ! तसा हे abstract लिखाण झाल...त्यामुळे हे publish करण्याजोग आहे का माहित नाही ! पण असं कुठे म्हटलंय कि फक्त रेखीव , कोरीव आणि कातीव लिखाण प्रसिद्ध कराव ? त्यामुळेच…..
No comments:
Post a Comment