जुनी गाणी मला खूप आवडतात- पण ती ऐकायला जास्त ! Youtube आल्यापासून आता कोणतेही गाणे बघणे सहज शक्य झालय . काही काही गाणी अगदी जुन्या काळात घेऊन जातात - त्या श्वेत शामल काळात - जेव्हा नायिकेच रूप खुलून दिसायच-कदाचित त्याच कारण आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरचा makeup जाणवत नसेल म्हणूनही....
असो...
आज जुन्या गाण्यात रमणार नाहीये....आज काही नव्या गाण्यांबद्दल....
काही काही नवी गाणी अगदी अद्भुत वाटतात मला - विशेषतः रेहमान , शंकर-एहसान -लॉय यांची - आणि चित्रीकरण म्हणाल तर संजय लीला भन्साळीची !
हल्लीच त्याच्या बाजीराव मस्तानी मधील ' दीवानी मस्तानी ' पाहण्याचा योग आला - ( खरं तर इतक्या मुबलक प्रमाणात इंटरनेटवर जे उपलब्ध आहे त्याला काय योग वगैरे म्हणणार ? ) पण छान चित्रीकरण - भव्य , सुरेख सेट - भन्साळीच्या इतमामाला शोभेलसा - लाखमोलाची दिसणारी दीपिका - मस्तानी म्हणून ती कशी दिसेल हे पूर्ण सिनेमा पाहिल्यावरच कळेल .....पण या गाण्यात खूप सुंदर ! रणबीर सिंघही बाजीराव म्हणून चांगला दिसतो - ( फक्त एक mature आणि लढवैया राजा म्हणून अगदी किंचित कमी वाटला - कारण त्याच स्मितहास्य - जे अगदी हळू फुलणारंकिंवा अस्फुट हव होतं....हे आपल माझं मत - पेशवे आपल्या खऱ्या भावना चारचौघात काय तर कधीकधी स्वतःलाही कळून देत नसावेत ! )
गाण्याला एकाच कडव आहे - मध्ये मध्ये filler music चे बरेच तुकडे - जे ही कानाला गोड वाटतात - खूप छान orchestration - खरं तर चाल किंवा शब्द उत्कृष्ट नाहीत - पण परिणामकारक नक्कीच आहेत - विशेषतः श्रेया गोशालचा आवाज ! फार सुरेख ! आता मस्तानी या प्रकारचे कपडे घालून , अस तंतुवाद्य घेऊन , अस नृत्य करत असेल हे माझ्या मनाला थोडा खटकल - पण थोडच !
यानंतर लगेच ' नगाडा संग ढोल " आठवतं - कारण तीच team आहे - खरं तर गाण्याची चाल आणि शब्द फारसे आवडले नाहीत - पण पुन्हा श्रेयाचा आवाज - तीक्ष्ण सुरीसारखा धारदार ! ढोलकीच्या ( ? ) beats ने ते गाणं खूप energetic झालय - मला सर्वात काय आवडत असेल तर ह्या गाण्यात असलेली रंगांची कल्पक योजना ! दीपिका नेहमीप्रमाणेच सुंदर दिसते आणि नाचतेही - तिचे आणि सर्व dancers चे well-synchronised costumes - लक्षवेधी लाल रंग ...दीपिकाचे नैसर्गिक wavy मोकळे केस आणि त्यांचा नृत्यातला कल्पक वापर ह्या गाण्याची ऊर्जा अधिकच वाढवतात .
ह्या रंगांपुढे कधीतरी आपली जुनी गाणी फिकी वाटतात ...पण क्षणभरच ! कारण ही रंगाची उधळण कालानुरूप फिकी पडते पण मुळची फिकी असलेली गाणी मात्र अधिकाधिक गहिरी होत जातात !
जाताजाता -
धूम ३ मधल " मलंग " हे गाणं पहिल्यांदाच नीट ऐकलं - कारण ते शंकर महादेवनच्या मोठ्या मुलाने - सिद्धार्थने गायल आहे - शब्द फार छान आहेत ! ' मलंग ' शब्दालाही अर्थ आहे - पहिल्यांदाच कळल ! पण त्याबद्दल पुन्हा कधी तरी !

सुन्दर लिखाण. पण बाजीराव मस्तानिचि कास्टिंग् मला अजिबात आवडली नाही.
ReplyDeleteहे माझे वैयक्तिक मत आहे.
गाणं बघायची उत्सुकता वाढली माया...नेहमीप्रमाणेच खूप छान लिहिलं आहेस 👍👌☺
ReplyDeleteKhup chhaan .....
ReplyDeleteThank you , maitraho !
ReplyDeleteThank you , maitraho !
ReplyDelete