चालायला तर लाग तू ….
वाट सापडेलच हळूहळू -
उजेडही होईल …...
जरी आता अंधार असला तरी ,
- कारण सूर्य या अंधाराच्या पलीकडेच आहे …..
वाट बघत थांबलाय ,
तुझी -
घाबरलीस ?
ही तर झाडं आहेत …..
राक्षस नाहीत ,
सावल्या आहेत …..
ज्या सोबतच करतात….. उजेडी …..
- आणि थोड चाललीस ,
तर जंगल संपेल -
मग -
फुलांच शेत ,
पहाट वाऱ्यावर डोलणारी फुलं …..
तुलाही वाटेल -
नाचावं …..
या फुलांसोबत …..
कारण ….पहाट झालीये ……
आणि हो ,
इथेच बसून राहिलीस ,
तर पहाट होईल आपल्या वेळी …..
पण तुझ्यापर्यंत पोचणार नाही ……
चाललीस तर ……
रंग , गंध , स्पर्श , उजेड …..
थोडक्यात ….स्वर्ग ……
फक्त चार पावलांवर …….
उठ …..
चल……
थांबू नकोस …..
वळू नकोस ……
पावलापुढे पाउल ……
टाकत राहा ……..
चालत राहा……
चालत राहा…...
No comments:
Post a Comment